फळ पिकविमा योजना : मृग व आंबिया बहारासाठी अधिसूचित पिकांना विमा संरक्षण
परभणी, 01 जुलै (हिं.स.) पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिकविमा योजना शासन निर्णयान्वये परभणी जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी लि. या कंपनीद्वारे मृग व आंबिया बहारमध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन २०२६-२७ या कालावधीसाठी जिल्ह्यात राबविण्यास मान्यता देण्
फळ पिकविमा योजना : मृग व आंबिया बहारासाठी अधिसूचित पिकांना विमा संरक्षण


परभणी, 01 जुलै (हिं.स.) पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिकविमा योजना शासन निर्णयान्वये परभणी जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी लि. या कंपनीद्वारे मृग व आंबिया बहारमध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन २०२६-२७ या कालावधीसाठी जिल्ह्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मृग बहार सन २०२६-२७ मध्ये चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू, संत्रा, सिताफळ व हळद या ८ पिकांसाठी तर आंबिया बहार सन २०२६-२७ मध्ये आंबा, केळी, डाळींब, पपई, मोसंबी व संत्रा या ६ पिकांसाठी फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार योजना राबविण्यात येत आहे.

दि. ११ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. १५ मे २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पिकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिकविमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२६-२७ मध्ये सदर योजनेत सहभागी होण्याकरिता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य आहे. तरी शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) तात्काळ काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले जो आहे.

मृग बहार सन २०२६-२७ अंतर्गत संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, लिंबू, चिकू, सिताफळ व हळद या पिकांसाठी शेतकरी विमा हप्ता, विमा संरक्षित रक्कम व विमा भरण्याची अंतिम दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संत्रा पिकासाठी प्रति हेक्टर ८ हजार ५०० रुपये विमा हप्ता, १ लाख रुपये विमा संरक्षित रक्कम व अंतिम दिनांक १४ जुन, २०२६, मोसंबीसाठी ८ हजार ५०० रुपये, १ लाख रुपये व ३० जून २०२६, डाळींबसाठी ६ हजार ४०० रुपये, १ लाख ६० हजार रुपये व १४ जुलै २०२६, पेरूसाठी ५ हजार ९५० रुपये, ७० हजार रुपये व १४ जुन, २०२६, लिंबूसाठी ६ हजार ८०० रुपये, ८० हजार रुपये व १४ जुन, २०२६, चिकूसाठी ५ हजार ९५० रुपये, ७० हजार रुपये व ३० जून २०२६, सिताफळासाठी ५ हजार ९५० रुपये, ७० हजार रुपये व ३१ जुलै २०२६ तसेच हळदीसाठी ७ हजार २०० रुपये, १ लाख ८० हजार रुपये व १४ जुन २०२६ अंतिम दिनांक निश्चित करण्यात आली आहे.

सन २०२६-२७ साठी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिकविमा योजना राबविण्याकरीता जिल्ह्यातील विविध तालुके व अधिसूचित महसूल मंडळांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मृग बहार अंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू, संत्रा, सिताफळ व हळद या पिकांसाठी परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, मानवत, पूर्णा, गंगाखेड, पालम व पाथरी तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी अथवा संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande