छ. संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था: वर्गात पावसाचे पाणी
छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगरातील शाळेची दुरावस्था डोळ्यासमोर आल्यानंतर शासकीय व्यवस्थेवर संताप व्यक्त होत आहे,पावसाचे पाणी वर्ग खोल्यांमध्ये पडत असून शाळेतील मुली पाण्यात भिजत शाळेत शिरलेले पाणी बाहेर काढत आहेत, प्लास्टिक
छ. संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था: वर्गात पावसाचे पाणी


छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगरातील शाळेची दुरावस्था डोळ्यासमोर आल्यानंतर शासकीय व्यवस्थेवर संताप व्यक्त होत आहे,पावसाचे पाणी वर्ग खोल्यांमध्ये पडत असून शाळेतील मुली पाण्यात भिजत शाळेत शिरलेले पाणी बाहेर काढत आहेत, प्लास्टिकची कचरा जमा करण्याची बादली, पाण्याची बाटली, जेवणाच्या प्लेटने हे पाणी बाहेर काढत आहेत.पावसाळ्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची ही अवस्था पाहून डिजिटल भारत कुठे गेला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande