वर्धा जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टीसरासरी १३२.२ मिमी पावसाची नोंद
अमरावती, 01 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्यात सध्या येत असलेला पावसाची कुठे बरसला कुठे रूसला अशी अवस्था आहे. काही भागात आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील रपटे, छोटे पूल वाहून गेले. जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे अतिवष्टीची नोंद करण्यात आली.

यात आर्वी, वाढोणा, विरूळ, रोहणा आणि सेलू तालुक्याती केळझरचा समावेश आहे. पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात पेरणीला वेग आला. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्यानंतर पाऊस काही भागात येतो तर काही भागात दांडी बसत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात सोमवारी झालेला पाऊस सर्वदूर असेल असे वाटत असताना केवळ पाच मंडळात असल्याची नोंद झाली. आर्वी, वाढोणा, रोहणा विरूळ आणि केळझर मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. सोमवारी जिल्ह्यात सरासरी १३२.२ मि.मी.पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टी झालेले मंडळ

आर्वी ७४.०

वाढोणा ११०.३

विरूळ ७८.८

रोहणी ६९.०

केळझर ६५.८

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

 rajesh pande