लातूरच्या पु. ला. शासकीय तंत्रनिकेतनला तब्बल १० वर्षानंतर मिळतोय पुर्णवेळ प्राचार्य
लातूर, 01 जुलै (हिं.स.)। तब्बल १० वर्षानंतर लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन ला पुर्णवळ प्राचार्य नियूक्त केल्याचा आदेश उच्च तंत्रशिक्षण विभागाने काढला असून खामगाव येथे कार्यरत असलेले समीर श्रीनिवास प्रभूणे यांची लातूरच्या पु. ला. शासक
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय


लातूर, 01 जुलै (हिं.स.)। तब्बल १० वर्षानंतर लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन ला पुर्णवळ प्राचार्य नियूक्त केल्याचा आदेश उच्च तंत्रशिक्षण विभागाने काढला असून खामगाव येथे कार्यरत असलेले समीर श्रीनिवास प्रभूणे यांची लातूरच्या पु. ला. शासकीय तंत्रनिकेतन चे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. पण, इथे पूर्णवेळ प्राचार्य न देता एखाद्या एचओडीला प्रभारी प्राचार्य म्हणून नियूक्त करून लातूरच्या तंत्रनिकेतन शिक्षणाची सरकार चेष्टा करत राहिले. २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांची बदली झाल्यानंतर म्हणजे १० वर्ष झाली येथील प्राचार्य पद प्रभारी होते. इथेच गेल्या वर्षीपासून शासकीय इंजिनिअरिंग चालू करण्यात आले आहे. तिथे देखील पूर्णवेळ प्राचार्य नाही. प्रभारीवरच कारोभार चालू आहे. तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग सारखा शिक्षण विभाग प्रभारीकडूनच चालविला जात असताना लोकप्रतिनिधी मात्र या विभागाकडे दुर्लक्ष करतात हे दुर्दैव !

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande