

परभणी, 01 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र विधान भवन येथे परभणी–हिंगोली विधान परिषद आमदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत शपथ घेतली. या वेळी सईद खान यांनी सांगितले की, आजचा दिवस आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण आहे.
हा सन्मान आणि हा ऐतिहासिक क्षण मला लाभण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अमूल्य मार्गदर्शन, प्रेम आणि आशीर्वाद आहेत. त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास, दिलेली संधी आणि केलेले उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.
हा केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून परभणी–हिंगोली जिल्ह्यातील जनतेचा, लोकप्रतिनिधींचा, महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गौरव आहे. आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच मला ही जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली आहे.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, परभणी–हिंगोलीच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य करण्याचा आज पुनः एकदा निर्धार व्यक्त करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis