नाझिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी; सर्वधर्म एकता मंचाचे पोलीस आयुक्तांना निवेदन
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। सर्वधर्म एकता मंच, सोलापूरच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देऊन नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि माँ आयेशा यांच्याविषयी कथितरीत्या केलेल्या वादग्र
fgdf


सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। सर्वधर्म एकता मंच, सोलापूरच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देऊन नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि माँ आयेशा यांच्याविषयी कथितरीत्या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात संबंधित व्हिडिओची सत्यता फॉरेन्सिक तपासणीद्वारे पडताळावी, प्रथमदर्शनी गुन्हा आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत तात्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवावा, तसेच प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सर्वधर्म एकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण यांनी, कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका मांडली. संबंधित प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या वेळी दासजी शेळके (मराठा समाज), विजयकुमार हत्तुरे (लिंगायत समाज), संजय बाबा शिंदे (चर्मकार समाज), शंकर चौगुले (वडार समाज), गणेश कोळी (कोळी समाज), आनंद चंदनशिवे (बौद्ध समाज), देवेंद्र भंडारे (मोची समाज), अनिल वसाम (पद्मशाली समाज), अजित कुलकर्णी (ब्राह्मण समाज), युवराज राठोड (बंजारा समाज), राज सलगर (धनगर समाज), श्याम धुरी (बिडर समाज), पोपटसिंग टाका (शीख समाज), पराग शहा (जैन समाज), विलास कटक-दौंड (ढोर समाज), मुन्नू सिंग बाबावाले (लोधी समाज), तुषार खंदारे (मातंग समाज), नागेश गायकवाड (कैकाडी समाज), रसूल पठाण, फारुख शेख तसेच विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवेदनाद्वारे सर्वधर्म एकता मंचाने धार्मिक सलोखा, सामाजिक शांतता आणि कायद्याचा सन्मान कायम राखण्याची भूमिका अधोरेखित केली असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande