
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। सोलापूर ग्रामीण पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ११ पोलीस निरीक्षक (पीआय) आणि २ सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जारी केले आहेत.
बदल्यानुसार, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार यांची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे यांची बदली सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील दीपक ज्योतिराम पाटील यांची मोहोळ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक बाळू रसिक भरणे यांची बदली टेंभुर्णी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील अमूल शंकर कादबने यांची वैराग पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ भानुदास वाघमोडे यांची बदली माळशिरस पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक तय्यूब मुजावर यांची बदली पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील सुरेश गणपतराव चिल्लावार यांची नियुक्ती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
माळशिरस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास चन्नवीर दिंड्डेरे यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात, तर नियंत्रण कक्षातील दीपक लक्ष्मण बरडे यांची जिल्हा वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. तसेच कमलाकर नरसिंह गड्डीमे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अक्षय आप्पासो सोनवणे यांची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील गणेश अण्णासाहेब कड यांची बदली सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे ग्रामीण पोलीस दलाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड