महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकजुटीमुळे हा विजय शक्य झाला - आ. सईद खान
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। आज मुंबई येथे शिवसेना आमदार सईद खान यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे आमदार संतोष दादा बांगर तसेच आमदार राजू भैय्या नवघरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी दिलेले
अ


परभणी, 01 जुलै (हिं.स.)। आज मुंबई येथे शिवसेना आमदार सईद खान यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे आमदार संतोष दादा बांगर तसेच आमदार राजू भैय्या नवघरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

विधान परिषद निवडणुकीत त्यांनी दिलेले अमूल्य सहकार्य, मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. त्यांच्या विश्वासामुळे आणि महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकजुटीमुळे हा विजय शक्य झाला, असे आमदार खान यांनी सांगितले

यावेळी विविध विकासकामे, जनहिताचे प्रश्न आणि आगामी वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य सदैव स्मरणात राहील. जनतेच्या सेवेसाठी अधिक समर्पितपणे कार्य करणे, हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande