खासदार श्रीकांत शिंदे महाआरोग्य सर्व रोगनिदान शिबिर आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला उपस्थित
नांदेड, 01 जुलै (हिं.स.)। नांदेड दौऱ्यानिमित्त आज किनवट येथे शिवसेनेचे श्री. विशाल जाधव यांच्या पुढाकारातून हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य सर्व रोगनिदान शिबिर आणि
Q


नांदेड, 01 जुलै (हिं.स.)।

नांदेड दौऱ्यानिमित्त आज किनवट येथे शिवसेनेचे श्री. विशाल जाधव यांच्या पुढाकारातून हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य सर्व रोगनिदान शिबिर आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केले. समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अशा लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री. विशाल जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जनतेच्या सेवेसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणारे कार्यकर्ते हेच शिवसेनेची खरी ताकद आहेत, असेही यावेळी नमूद केले.

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या जनहिताच्या आणि विकासाभिमुख कामांची माहिती दिली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आज राज्यभरातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास अधिक दृढ होत असून, मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व शिवसेनेसोबत कार्यरत असल्यामुळे या भागाच्या विकासाला निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी परिसरातील विविध विकासकामांसंदर्भातील मागण्या आणि महत्त्वाचे प्रश्न माझ्यासमोर मांडले. या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी दिली.

या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, वेळेवर आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही केले. तसेच आज लोकार्पण करण्यात आलेल्या रुग्णवाहिका दुर्गम आणि गरजू नागरिकांसाठी आपत्कालीन आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार ठरतील आणि अनेकांचे जीव वाचविण्यात त्यांची मोलाची भूमिका असेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी खासदार नागेश आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, राज्य संघटनप्रमुख आनंद परांजपे, पोहरादेवी संस्थेचे महंत जितेंद्र महाराज, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande