सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहिमेची सुरुवात
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जुना पुणा नाका येथील श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरापासून विशेष स्वच्छता मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोला
Nak


सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जुना पुणा नाका येथील श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरापासून विशेष स्वच्छता मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायकदादा कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शहर अधिक स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ,सभागृहनेते नरेंद्र काळे, उपायुक्त शशिकांत भोसले, नगरसेवक बिजू अण्णा प्रधाने तसेच प्रभाग क्रमांक १ मधील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande