विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे उत्साहात स्वागत
The palanquin of Vishwaguru Sant Shrestha Nivruttinath Maharaj was welcomed with enthusiasm.
The palanquin of Vishwaguru


The palanquin of Vishwaguru


नाशिक, 01 जुलै (हिं.स.) : नाशिक महानगरपालिका, संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज सामाजिक सेवा संस्था आणि पंचायत समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

नाशिक पंचायत समितीच्या आवारात पालखी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालखीच्या आगमनप्रसंगी महापालिकेच्या वतीने महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेत्या सीमा ठाकरे, प्रभाग सभापती सुरेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि उपायुक्त नितीन नेर यांनी पालखीचे स्वागत केले.

या पालखी सोहळ्यास विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सोनिया नाकाडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, मनपा उपायुक्त नितीन नेर, नगरसचिव संजय नेरकर, महंत संविदानंदजी सरस्वती, भक्तीचरणदास महाराज, ह.भ.प. अण्णा महाराज हिसवळकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, गटनेत्या सीमा ठाकरे, रंजन ठाकरे, संस्थेचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, कांचनताई जगताप, पालखी सोहळा प्रमुख माधवदास महाराज राठी, सचिव श्रीपाद कुलकर्णी, संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष पद्माकर पाटील, सरचिटणीस सचिन डोंगरे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, तानाजी जायभावे, हेमंत धात्रक, नितीन ठाकरे, जयंत गोसावी, निलेश गाढवे, कैलास सोनवणे, अमोल ठोंबरे, पंचायत समितीच्या सोनिया नाकाडे, रमेश कडलग, नरेद्र उगलमुगले यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, वारकरी आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुख-समाधान लाभावे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्वांनी विठुरायाकडे राज्यात मुबलक पाऊस पडावा, नद्या-नाले व धरणे भरावीत, शेती समृद्ध व्हावी तसेच सर्वांना सुख आणि समाधान लाभावे, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

स्वागतासाठी कायमस्वरूपी कमान : महापौर हिमगौरी आहेर-आडके

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी कायमस्वरूपी कमान उभारण्यात येणार असून त्यावर संत निवृत्तीनाथ महाराज प्रवेशद्वार असा नामफलक लावण्यात येईल, अशी घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केली.

नामकरणाच्या मागणीचा विचार : आयुक्त मनीषा खत्री

नाशिक-त्र्यंबक रस्त्याला संत निवृत्तीनाथ महाराज मार्ग असे नामकरण करण्याच्या मागणीचा सर्वसाधारण सभेत निश्चितपणे विचार करून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande