परभणीत वसंतराव नाईक जयंती निमित्त पूर्णाकृती पुतळ्यास हजारो नागरिकांद्वारे अभिवादन
परभणी, 01 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त बुधवार 01 जूलै रोजी वसमत रोडवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक
परभणीत वसंतराव नाईक जयंती निमित्त पूर्णाकृती पुतळ्यास  हजारो नागरिकांद्वारे अभिवादन


परभणी, 01 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त बुधवार 01 जूलै रोजी वसमत रोडवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. कैलास चव्हाण हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गणेशराव देशमुख, प्रा. बबन पवार, बंजारा ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष इंजि. रामदास आढे यांची उपस्थिती होती. यावेळी शुभम जाधव, राजेशजी जाधव, राजू पवार, सुनील पवार यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande