आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरमध्ये सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन
लातूर, १ जुलै (हिं.स.) : उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उदगीरच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिक
संजय बनसोडे


लातूर, १ जुलै (हिं.स.) : उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उदगीरच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आमदार बनसोडे यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande