शिक्षक पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबवा; संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा परिषदेला निवेदन
सोलापूर, १ जुलै: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (श्रेणी-२ व श्रेणी-३), केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने प्रशासन विभागाच्या उपमुख
fgdf


सोलापूर, १ जुलै: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (श्रेणी-२ व श्रेणी-३), केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या शिष्टमंडळात संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, प्रदीप तांदळे, रामराजे मुसळे, शंकर थोरात, इंदलकर यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.

निवेदनात प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांवरील पदोन्नती प्रक्रिया दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने पात्र शिक्षकांना न्याय मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र शिक्षकांना संधी देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पदोन्नती प्रक्रिया शक्य तितक्या लवकर राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे उपस्थित शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच पदोन्नती प्रक्रिया मार्गी लागून पात्र शिक्षकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande