नाशिक : 300 सायकलस्वार पंढरपूरच्या वारीला
नाशिक, 12 जुलै, (हिं.स.)। नाशिक येथून सुमारे ३०० सायकलस्वार, त्यामध्ये ५५ महिला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त सहभाग, पंढरपूर वारीसाठी मोठ्या उत्साहात रवाना झाले. मुंबईहून आलेल्या दृष्टी हिंदी सायकलिंग कमांडो संघाच्या सायकलस्वारांनीही या वारीत सहभाग घेत
300 cyclists to Pandharpur


नाशिक, 12 जुलै, (हिं.स.)। नाशिक येथून सुमारे ३०० सायकलस्वार, त्यामध्ये ५५ महिला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त सहभाग, पंढरपूर वारीसाठी मोठ्या उत्साहात रवाना झाले. मुंबईहून आलेल्या दृष्टी हिंदी सायकलिंग कमांडो संघाच्या सायकलस्वारांनीही या वारीत सहभाग घेतला. या वारीच्या शुभारंभ प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे, नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन चे संस्थापक . हरिष बैजल, वनविभागाचे . कृष्ण भवर, हिरालाल चौधरी, अमोल जाधव आरटीओ ,लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते सायकल राईड ला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली त्यांच्या सुरक्षित आणि यशस्वी प्रवासासाठी या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

ही सायकल वारी केवळ धार्मिक श्रद्धेची नसून पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली, महिला सक्षमीकरण आणि अवयवदान जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विविध सामाजिक संदेश देत सायकलस्वार पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या वारीत सहभागी सर्व सायकलस्वारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने हा प्रवास पूर्ण करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या प्रसंगी उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला, सचिव नितीन कोटकर, संचालक माधुरी गडाख, अश्विनी कोंडेकर,दिपाली माळी हे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande