
छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै (हिं.स.)। विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी (आण्णा) यांच्या दिंडीला आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट दिली.या दिंडीत छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील विविध गावांतील शेकडो वारकरी भक्तिभावाने सहभागी झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बोचरे आण्णांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वारीची परंपरा जपत आहे. वारकऱ्यांच्या निवास, भोजन, आरोग्य आणि इतर सर्व सोयींची काळजी घेत ही दिंडी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत नियोजनबद्ध मार्गक्रमण करते. हरिपाठ, कीर्तन, अभंग आणि अखंड नामस्मरणातून ही दिंडी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे जतन करत आहे.
ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी (आण्णा) यांच्या या सेवाभावी कार्याला मनःपूर्वक प्रणाम. दिंडीतील सर्व वारकरी माऊलींना पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis