छ. संभाजीनगर - ह.भ.प.केंद्रे महाराज यांच्या दिंडीला आ. अनुराधा चव्हाण यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै (हिं.स.)। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाचे नाव घेत मार्गक्रमण करणाऱ्या ह.भ.प.केंद्रे महाराज यांच्या दिंडीला आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट देऊन दर्शन घेतले. वारकरी बांधवांसोबत काही क्षण घ
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै (हिं.स.)। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाचे नाव घेत मार्गक्रमण करणाऱ्या ह.भ.प.केंद्रे महाराज यांच्या दिंडीला आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

वारकरी बांधवांसोबत काही क्षण घालवत त्यांच्या निस्वार्थ भक्तीचा, शिस्तीचा, साधेपणाचा आणि एकोप्याचा अनुभव घेता आला.. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी समृद्ध झालेली ही वारकरी परंपरा आजही समाजाला समता, सेवा, सदाचार आणि भक्तीचा मार्ग दाखवत आहे.

यावेळी माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांचीही भेट झाली. सर्व वारकरी बांधवांना पुढील वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande