भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल मकरिये यांनी दिली आहे भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेला प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभ
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)।

भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल मकरिये यांनी दिली आहे

भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेला प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तयारी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.

आगामी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाच्या पूर्वनियोजन बैठकीत सहभाग घेतला.. रथयात्रा अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी श्री.प्रभुजी जीव दयादासजी, डॉ.रमेश लड्डाजी, उद्योगपती श्री.विनोद बगाडियाजी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे, नगरसेविका सीमाताई साळवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल सदस्य तथा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वलाताई दहिफळे, मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande