छ. संभाजीनगर : भाजी मंडईतील पात्र ओटे व गाळेधारकांना लवकरच मिळणार जागा
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। संभाजीपेठ येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईतील पात्र ओटे व गाळेधारकांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची पाहणी करत संबंधित अधिकारी व गाळेधारकांशी छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेचे
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)।

संभाजीपेठ येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईतील पात्र ओटे व गाळेधारकांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची पाहणी करत संबंधित अधिकारी व गाळेधारकांशी छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेचे सभापती अनिल मकरिये यांनी संवाद साधला.

त्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक सूचना देत प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी भर देण्यात आला.

१४ वर्षांनंतर भाजी मंडई पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, व्यापाऱ्यांना न्याय मिळावा, स्थानिक व्यापाराला नवी चालना मिळावी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने सुरू आहे. नागरिकांच्या अडीअडचणी त्यांनी समजावून घेत तातडीने या सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली आह

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande