
रत्नागिरी, 12 जुलै, (हिं.स.) । चिपळूण बाजार पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी कालुस्ते परिसरात आढळून आला. रिजवान बरकार (वय २५, रा. गोवळकोट, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काल, दि. ११ जुलै रोजी रात्री रिजवानने चिपळूण बाजार पुलावरून नदीत उडी घेतली होती. हे समजताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. पुलावर तरुणाची चप्पल आणि कपडे आढळून आले होते. रात्रभर शोधकार्य सुरू ठेवण्यात आले होते, मात्र अंधार आणि नदीच्या प्रवाहामुळे मृतदेह मिळवण्यात अडचणी येत होत्या. अखेर आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कालुस्ते परिसरात मृतदेह तरंगताना आढळला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी