रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण उड्डाणपूल ९० टक्के पूर्ण
रत्नागिरी, 12 जुलै, (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उड्डाणप
चिपळूमधील उड्डाण पूल


रत्नागिरी, 12 जुलै, (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न संबंधित ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाकडून सुरू आहेत. या पुलामुळे चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

सध्या पुलावरील स्लॅब, संरचनात्मक कामे आणि बहुतांश नागरी बांधकाम पूर्ण झाले असून, अंतिम टप्प्यात डांबरीकरण, सुरक्षा कठडे, रस्त्यावरील चिन्हांकन, विद्युत व्यवस्था, प्रकाशयोजना तसेच अन्य पूरक कामांना वेग देण्यात आला आहे. पावसामुळे काही प्रमाणात कामाच्या गतीवर परिणाम झाला असला तरी ठेकेदार कंपनीकडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande