छ. संभाजीनगर - अल्पसंख्यांक वसतिगृहातील सुविधा निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक वसतिगृहातील प्रलंबित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधि
छ. संभाजीनगर - अल्पसंख्यांक वसतिगृहातील सुविधा निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)।

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक वसतिगृहातील प्रलंबित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिले.

अल्पसंख्यांक वसतिगृहातील विविध सुविधा व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा सहायक नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, श्री. एस. एल. कोंडावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. विशेषतः सोलर वॉटर हिटर, पाईपलाईन व्यवस्था, आवश्यक फर्निचर, विद्युत जोडणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पेव्हर ब्लॉक बसविणे, ड्रेनेज लाईन तसेच इतर आवश्यक कामे मंजूर दरपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मुलींच्या अल्पसंख्यांक वसतिगृहातील सर्व कामे 15 दिवसांच्या आत, तर मुलांच्या वसतिगृहातील कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करून वसतिगृहे विद्यार्थ्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त निवासी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande