लातूर : जळकोट तालुक्यातील २७ ग्रा. पं.च्या वॉर्ड आरक्षणास जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता
लातूर, 12 जुलै (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील राजकारणाच्या आखाड्यात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी आता लवकरच सुरु होणार आहे. मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतचे आरक्षण १२ जून रोजी काढण्यात आले होते. यानंतर आरक्ष
ग्रामपंचायत आरक्षण


लातूर, 12 जुलै (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील राजकारणाच्या आखाड्यात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी आता लवकरच सुरु होणार आहे. मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतचे आरक्षण १२ जून रोजी काढण्यात आले होते. यानंतर आरक्षण प्रारूप यादी प्रसिद्ध हरकती व सूचना १९ ते २५ जूनपर्यंत कालावधी होता. जळकोट तालुक्यातील एका ग्रामपंचायतमध्ये यासाठी हरकत नोंदविण्यात आली होती. या प्रभागनिहाय आरक्षणाच्या अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी देण्यात आली.

त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे विशे विशेष ग्रामसभा झाली. ही सोडत महसूल अधिकारी, कर्मचारी, ग्राम विकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली होती. तालुक्यात ४३ ग्रामपंचायती असून २७ ग्रामपंचायतची मुदत संपली आ-हे. वॉर्ड रचना या पूर्वीच झाली होती. तसेच ग्रामपंचायत पातळीवर आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता या आरक्षण सोडतीस अंतिम स्वरूप देण्यात आलेले आहे. आता याच आरक्षणावर येणाऱ्या निवडणुका होणार आहेत.

जळकोट तालुक्यातील रावणकोळा, हाळदवाढवणा, पाटोदा खुर्द, तिरुका, घोणसी, डोंगरगाव, अतनूर, मरसांगवी, गव्हाण, धामणगाव, गव्हाण, येलदरा, चिचोली, सुल्लाळी, एकुगा खुर्द, बोरगाव खुर्द, विराळ, कोळनूर, शेलदरा, वांजरवाडा, वडगाव, बेळसांगवी, सोनवळा, कोनाळी डोंगर, लाळी बु., कुणकी, मेवापूर, शिवाजीनगर तांडा. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande