नाशिक : राष्ट्रवादी भवनात उद्यापासून दर सोमवारी जिल्हाध्यक्ष नागरिकांना भेटणार
नाशिक, 12 जुलै, (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविणे, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामांना गती देणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्य
District President will


नाशिक, 12 जुलै, (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविणे, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामांना गती देणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोमवार, दि. १३ जुलै २०२६ पासून राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना. छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्यासाठी सहज उपलब्ध व्यासपीठ निर्माण करून त्यांचे प्रभावीपणे निवारण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande