जयसिंग शिवाजीराव पंडित आळंदी ते पंढरपूर या पावन दिंडीत सहभागी
बीड, 12 जुलै (हिं.स.)।शिवछत्र परिवाराने वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत निष्ठेने आणि भक्तीभावाने कायम जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही याच परंपरेचा वारसा पुढे नेत, जयसिंग शिवाजीराव पंडित (भाऊ) हे आपल्या सहकाऱ्यांसह आळंदी ते पंढरपूर या पावन दिंडी
अ


बीड, 12 जुलै (हिं.स.)।शिवछत्र परिवाराने वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत निष्ठेने आणि भक्तीभावाने कायम जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही याच परंपरेचा वारसा पुढे नेत, जयसिंग शिवाजीराव पंडित (भाऊ) हे आपल्या सहकाऱ्यांसह आळंदी ते पंढरपूर या पावन दिंडीत सहभागी होत आहेत.

अत्यंत मंगलमय वातावरणात त्यांचे आळंदी (देवाची) कडे प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात पाऊले गुंफत, 'ज्ञानबा-तुकाराम'च्या गजरात ते पंढरीचा हा आध्यात्मिक प्रवास पूर्ण करतील. वारीच्या या आनंदमयी प्रवासासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande