
बीड, 12 जुलै (हिं.स.)। बीडचे माजी खासदार तथा बीड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष स्व. द्वारकादासजी मंत्री यांचे शहराच्या जडण - घडणीमध्ये अमुल्य योगदान आहे. त्यांचे समाजकारण आणि दूरदृष्टी भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या स्मृतींचे जतन व्हावे आणि त्यांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला व्हावी यासाठी बीड नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात त्यांचा पुतळा उभा रहावा अशी सर्व बीडवासियांची इच्छा होती. स्व. द्वारकादासजी मंत्री यांच्या पुतळ्याच्या उभारणीचा भुमिपूजन सोहळा संपन्न झाला.
आजच्या कार्यक्रमाला संतोष सोहनी यांच्यासह बीड शहरातील आजी - माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगर परिषदेचे पदाधिकारी, स्व. द्वारकादासजी मंत्री स्मृती समितीचे सदस्य आणि बीडकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्थायी समिती सदस्य तथा बीड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमर नाईकवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis