बीड - राष्ट्रीय महामार्गाच्या कामात उच्चस्तरी चौकशी आणि ऑडिटला सुरुवात
बीड, 12 जुलै (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील सिमेंट रस्त्यावरील मोठमोठ्या भेगा, खड्डे आणि चुकीच्या डिझाइन, स्ट्रक्चर बाबत खासदार बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी आणि ऑडिटला सुर
राष्ट्रीय महामार्ग


बीड, 12 जुलै (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील सिमेंट रस्त्यावरील मोठमोठ्या भेगा, खड्डे आणि चुकीच्या डिझाइन, स्ट्रक्चर बाबत खासदार बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी आणि ऑडिटला सुरुवात झाली आहे.बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जा, संथ गती आणि अनेक ठिकाणी रखडलेली कामे याबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांना पत्राद्वारे तक्रार केली होती. संबंधित कामांची उच्चस्तरीय चौकशी करून त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करावे, दोषी अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी तसेच रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. या पत्राची दखल घेत दिल्लीहून केंद्रीय पथक बीड जिल्ह्यात दाखल झाले असून विविध ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे नमुने (सॅम्पल) घेण्यास सुरुवात झाली आहे.रस्त्यावरील पडलेला भेगा, खड्डे, चुकीची डिझाइन यासंदर्भात ऑडिटची सुरुवात झाली असून तांत्रिक बाबी देखील तपासल्या जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande