
नांदेड, 12 जुलै (हिं.स.)।
२५ कोटींचे क्रीडा संकुल आणि रिसनगाव येथे 'बिबट संवर्धन केंद्र' प्रस्तावित! असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
लोहा तहसील कार्यालयात सर्व विभागांची धडक आढावा बैठक संपन्न झाली.
लोहा-कंधार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. विस्तृत आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
भव्य क्रीडा संकुल: कंधार येथे २५ कोटी रुपये खर्चाचे भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
बिबट संवर्धन केंद्र: लोहा तालुक्यातील रिसनगाव वनपरिक्षेत्रात 'बिबट संवर्धन केंद्र' उभारण्यासाठी प्रयत्न सुरू. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर केले जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis