छ. संभाजीनगर - महाराष्ट्र परिषद व खुली केंद्रीय कार्यकारिणी सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र परिषद व खुली केंद्रीय कार्यकारिणी सभा संपन्न झाली. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. या सभेत संघटनेच्या कामग
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र परिषद व खुली केंद्रीय कार्यकारिणी सभा संपन्न झाली. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

या सभेत संघटनेच्या कामगारांचे प्रश्न तसेच वीज क्षेत्रातील बदलत्या धोरणांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांचे हक्क अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी पुढील कालावधीतील कार्याची दिशा निश्चित करण्यात आली.

यावेळी राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांनी उपस्थितांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांचा देखील संघटनेला निश्चितच लाभ होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande