हिंगोलीत शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी १४ जुलैला संयुक्त बैठक
हिंगोली, 12 जुलै (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन २०२६-२७ या वर्षातील विविधस्तर शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नि
हिंगोलीत शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी १४ जुलैला संयुक्त बैठक


हिंगोली, 12 जुलै (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन २०२६-२७ या वर्षातील विविधस्तर शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांचे शारीरिक शिक्षक तसेच एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा (मक्ता), हिंगोली येथे होणार आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व शाळांचे शारीरिक शिक्षक तसेच एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांनी उपस्थित राहून शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande