पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी समाजहिताचा स्वीकार करून घेतलेला पुढाकार प्रेरणादायी - अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। निसर्गाचे संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी समाजहिताचा स्वीकार करून घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। निसर्गाचे संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी समाजहिताचा स्वीकार करून घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी राजे बोलत होते

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त रामराज ग्रुपच्या वतीने साई टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. निसर्ग जपण्यासाठी प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे, हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande