
बीड, 12 जुलै (हिं.स.)। सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र महाराज पाटील, संस्थानचे विश्वस्त सम्राट पाटील, चोपदार पंकज महाराज पाटील, सुधाकर पाटील, रतिराम महाराज यांच्यासह पालखी सोहळ्यातील मान्यवरांनी आज ' शिवछत्र ' निवासस्थानी भेट दिली.
दरवर्षी मुक्ताई पालखीचे बीड शहरात आगमन झाल्यानंतर संस्थानचे पदाधिकारी माजी मंत्री श्री. शिवाजीराव दादा पंडित यांच्या निमंत्रणावरून शिवछत्र निवासस्थानी भेट देतात.
आज श्री क्षेत्र मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष व इतर मान्यवरांचा हृदय सत्कार माजी मंत्री श्री शिवाजीराव दादा पंडित यांनी केला. पंडित परिवाराकडून मागिल दोन पिढ्यांपासून ही परंपरा अखंडित सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis