छ. संभाजीनगर - सर्व नगरसेवक व नगरसेविकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। स्प्री मनोर हॉटेल, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रजा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक व नगरसेविकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन क
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। स्प्री मनोर हॉटेल, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रजा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक व नगरसेविकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची भूमिका, प्रभावी प्रशासन, नागरिकाभिमुख कार्यपद्धती, पारदर्शकता, उत्तरदायित्व तसेच शाश्वत शहरी विकास या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

अशा उपयुक्त आणि ज्ञानवर्धक उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधींना अधिक परिणामकारकपणे जनसेवा करण्यासाठी निश्चितच प्रेरणा व दिशा मिळते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande