जालना विकासासाठी ५०० कोटींचा निधी; उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार – खोतकर
जालना, 12 जुलै (हिं.स.)। आमदार खोतकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जालना मतदारसंघाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविल्याची माहिती दिली. त्यांनी सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न, जालना शहर व ग्रामीण भागातील गंभ
अ


जालना, 12 जुलै (हिं.स.)। आमदार खोतकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जालना मतदारसंघाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविल्याची माहिती दिली. त्यांनी सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न, जालना शहर व ग्रामीण भागातील गंभीर वीज समस्या, वाढती बालगुन्हेगारी, वृक्षलागवड, खरपुडी येथील रखडलेला सिडको प्रकल्प, भूसंपादनाचा प्रश्न, जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदारांचे प्रश्न, जन्म-मृत्यू दाखले, भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलाच्या प्रश्नांसह अनेक महत्त्वाचे विषय उपस्थित करून त्यावर शासनाचे लक्ष वेधल्याचे सांगितले.याशिवाय, जालना शहरात सुरू असलेली विविध विकासकामे ही आपण मंजूर करून घेतलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या विकास निधीतून होत असल्याचे सांगत उर्वरित विकासकामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande