लातूर - लामजना येथे जनआरोग्य समितीची बैठक उत्साहात संपन्न
लातूर, 12 जुलै (हिं.स.)। औसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, लामजना येथे जनआरोग्य समितीची बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. लामजना प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात आरोग्य सेवा योग्य रीतीने पोहोचवण्यासाठी व लोकांना
जन आरोग्य समिती


लातूर, 12 जुलै (हिं.स.)। औसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, लामजना येथे जनआरोग्य समितीची बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. लामजना प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात आरोग्य सेवा योग्य रीतीने पोहोचवण्यासाठी व लोकांना योग्य उपचार मिळावा यासाठी जन आरोग्य बैठक पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती शालिनीताई चव्हाण (जिल्हा परिषद सदस्या, लामजना गट) पंचायत समिती सदस्य अंजुमबी कारभारी, डॉ. देवणीकर सर (तालुका आरोग्य अधिकारी), श्रीमती डॉ. मुळे मॅडम (प्रथम वैद्यकीय अधिकारी), डॉ. शहाणवाझ सर (वैद्यकीय अधिकारी), महेश सगर (सरपंच, लामजना), बालाजी पाटील (उप सरपंच, लामजना) तसेच जनआरोग्य समितीचे सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मा. कार्यक्रमाच्या डॉ. मुळे मॅडम यांनी प्रस्तावना मांडून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. त्यांनी बैठकीची रूपरेषा

स्पष्ट करत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा, भविष्यात रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

यानंतर नव्याने गठित करण्यात आलेल्या जनआरोग्य समितीचा परिचय करून देण्यात आला. समितीचे अध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये चालू आर्थिक वषार्तील मंजूर अर्थसंकल्प, नियोजित खचार्चा तपशील, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, जनसंवाद यात्रेचा आढावा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. याशिवाय रुग्णांना सेवा देताना येणाऱ्या अडचनि निदर्शनास आणून देण्यात आल्या.

अध्यक्षीय भाषणात शालिनी चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कायाचें कौतुक करत समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दजेर्दार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना देत आरोग्य विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी मा. डॉ. देवणीकर (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्या गांभीयार्ने सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बंडे सर (तालुका आरोग्य सहाय्यक) यांनी केले. शेवटी उपस्थित अध्यक्षा, सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, जनआरोग्य समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande