बीडमध्ये सुभाष रोडचे ‘संत मुक्ताई मार्ग’ असे नामकरण
बीड, 12 जुलै (हिं.स.)। सालाबादाप्रमाणे बीड शहरामध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. या मंगल प्रसंगी एक अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बीड शहरातील ज्या मुख्य रस्त्यावरून संत मुक्ताईंची पालख
Q


बीड, 12 जुलै (हिं.स.)। सालाबादाप्रमाणे बीड शहरामध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. या मंगल प्रसंगी एक अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बीड शहरातील ज्या मुख्य रस्त्यावरून संत मुक्ताईंची पालखी मार्गस्थ होते, त्या 'सुभाष रोड'चे बीड नगर परिषदेच्या वतीने ‘संत मुक्ताई मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.

पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी आणि जिल्ह्यातील तमाम संत-महंतांच्या शुभहस्ते या नामफलकाचे अनावरण संपन्न झाले. या निर्णयामुळे बीड शहराच्या महान अध्यात्मिक परंपरेला एक नवे वैभव प्राप्त झाले आहे. वारकरी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांनी या निर्णयाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले.

या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित असलेले सर्व व्यापारी बांधव, विविध अध्यात्मिक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, शिवछत्र परिवाराचे सर्व कार्यकर्ते आणि तमाम बीडकर भाविकांचे मनःपूर्वक आभार.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande