रत्नागिरी : मालतीबाई जोशी विद्यामंदिरात शालेय आरोग्य तपासणी
रत्नागिरी, 12 जुलै (हिं.स.) । येथील कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. शैलेश पाटील, डॉ. मीनल जोग यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर १३ विद्यार्थ्यांना आ
रत्नागिरी : मालतीबाई जोशी विद्यामंदिरात शालेय आरोग्य तपासणी


रत्नागिरी, 12 जुलै (हिं.स.) । येथील कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली.

डॉ. शैलेश पाटील, डॉ. मीनल जोग यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर १३ विद्यार्थ्यांना आवश्यक ती औषधे देण्यात आली, तर ५ विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी अंगी लावून घ्याव्यात, असे आवाहन यावेळी डॉक्टरांनी केले. शिक्षिका सौ. सावर्डेकर यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande