छ. संभाजीनगर - अतुल सावे यांच्या हस्ते श्री जागृत हनुमान मंदिराच्या नव्या छताच्या कामाचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील श्री जागृत हनुमान मंदिर, विद्यानगर येथे नव्या छताच्या कामाचे पूजन संपन्न झाले. मंदिर हे श्रद्धा, संस्कार आणि समाजाला एकत्र बांधणारे पवित्र केंद्र आहे. मंदिर
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील श्री जागृत हनुमान मंदिर, विद्यानगर येथे नव्या छताच्या कामाचे पूजन संपन्न झाले. मंदिर हे श्रद्धा, संस्कार आणि समाजाला एकत्र बांधणारे पवित्र केंद्र आहे. मंदिराच्या विकासासाठी सुरू झालेले हे काम भाविकांसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सुविधायुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे ठरणार आहे. असे यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. हे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होवो आणि मंदिराची सेवा अखंडपणे सुरू राहो, हीच प्रभू श्री हनुमान चरणी प्रार्थना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande