सोलापुरातील नाल्यांवर आणि नदीपात्रातील बांधकामांवर पालकमंत्र्यांचे कडक कारवाईचे संकेत
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)। आतील भागात बांधकाम परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा स्पष्ट इशारा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेयांनी दिला. आदिला नदीसह शहरातील सर
Jay Kumar gore


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)। आतील भागात बांधकाम परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा स्पष्ट इशारा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेयांनी दिला. आदिला नदीसह शहरातील सर्व प्रमुख नाल्यांचे पूरनियंत्रण रेखांकन तातडीने निश्चित करून जलसंपदा विभागाचा अभिप्राय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिला नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यावेळी नदीपात्रात अतिक्रमण करून बांधकाम झाल्याचे आरोपही झाले होते.बैठकीत आमदारसुभाष देशमुखयांनी आदिला नदी परिसरातील वाढती बांधकामे, ७४ नाल्यांचा गंभीर प्रश्न आणि त्या परिसरातील मंजूर लेआऊटबाबत चिंता व्यक्त केली. या लेआऊटमधील बांधकाम परवानग्या पुढील काळात महापालिकेकडे येणार असल्याने हा विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,पूरनियंत्रण रेषेच्या आतील भागात बांधकाम परवानगी दिली असल्यास संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील.त्यामुळे आदिला नदी असो किंवा शहरातील कोणताही नाला, त्याचे अधिकृत पूरनियंत्रण रेखांकन निश्चित करून त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावेत.तसेच आदिला नदीचे खोलीकरण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करावा, असे निर्देश देताना त्यांनी गेल्या ५० वर्षांत या नदीला एवढा मोठा पूर आला नव्हता, याकडे लक्ष वेधले. नदीपात्राचे खोलीकरण आणि पूररेषेचे वैज्ञानिक रेखांकन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande