छ. संभाजीनगर - छावणी-पडेगाव मंडळातील BLA-2 पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा व नियोजन बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। संपर्क कार्यालय, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम विधानसभा अंतर्गत छावणी-पडेगाव मंडळात
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। संपर्क कार्यालय, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम विधानसभा अंतर्गत छावणी-पडेगाव मंडळातील BLA-2 पदाधिकाऱ्यांची Special Intensive Revision (SIR) अभियानाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा व नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत SIR अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, बूथस्तरावरील कामकाजाचा आढावा, आगामी नियोजन तसेच प्रत्येक BLA-2 पदाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचना व संघटनात्मक नियोजनावरही यावेळी सखोल चर्चा झाली.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे, श्री.करणसिंग काकस, नगरसेवक श्री. किशोर मानकापे, श्री. योगेश वाणी, मंडळ अध्यक्ष श्री.निलेश धारकर, श्री. यज्ञेश बसैये, श्री. सागर पाले तसेच पश्चिम विधानसभा अंतर्गत छावणी-पडेगाव मंडळातील BLA-2 पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande