तांत्रिक बिघाड दूर; नगराध्यक्ष हलगरकर यांच्या पुढाकाराने निलंगा शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत
लातूर, 12 जुलै, (हिं.स.)। तांत्रिक कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने निलंगा शहराचा पाणीपुरवठा काही काळासाठी ठप्प झाला होता. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांनी भाजपा शहराध्यक्ष रवी फुलारी व संबंधित अधिकाऱ्यांसह तत्काळ सं
नगराध्यक्ष संजय  हलगरकर


लातूर, 12 जुलै, (हिं.स.)। तांत्रिक कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने निलंगा शहराचा पाणीपुरवठा काही काळासाठी ठप्प झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांनी भाजपा शहराध्यक्ष रवी फुलारी व संबंधित अधिकाऱ्यांसह तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी महावितरण तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्युत पुरवठा खंडित होण्यामागील कारणांची माहिती घेतली. आवश्यक सूचना देत तांत्रिक अडचण तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

संबंधित कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून बिघाड दुरुस्त केला आणि विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठाही पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना होणारा संभाव्य पाणीटंचाईचा त्रास टळला.

यावेळी नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांनी नागरिकांना अत्यावश्यक सेवा अखंडित ठेवणे ही निलंगा नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. भविष्यात अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande