छ. संभाजीनगर येथील एसआयआर कॅम्पला अतुल सावे यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील ओमप्रकाश प्राथमिक हायस्कूल, एन-६ मध्ये सुरू असलेल्या एसआयआर कॅम्पला भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली. कॅम्पमध्ये कार्यरत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संव
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील ओमप्रकाश प्राथमिक हायस्कूल, एन-६ मध्ये सुरू असलेल्या एसआयआर कॅम्पला भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली. कॅम्पमध्ये कार्यरत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविणे आणि प्रत्येक पात्र मतदारापर्यंत ही प्रक्रिया पोहोचविण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी मंडळ अध्यक्ष श्रीनिवास देव, नगरसेवक शिवाजी दांडगे, नगरसेवक मयूर वंजारी, नितीन खरात, अविनाश पवार, अरुण पालवे आणि छायाताई हरपळे यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande