रत्नागिरी : भाट्ये किना-यावर बंधाऱ्याचे काम थांबविण्याबाबत बंदरविकासमंत्र्यांना निवेदन
रत्नागिरी, 12 जुलै, (हिं.स.) । भाट्ये (ता. रत्नागिरी) येथील समुद्रकिना-यावर बांधण्यात येणा-या बंधा-याला भाट्ये ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबत त्यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांना साकडे घातले आहे. वेळीच हे काम थांबवले नाह
रत्नागिरी : भाट्ये किना-यावर बंधाऱ्याचे काम थांबविण्याबाबत बंदरविकासमंत्र्यांना निवेदन


रत्नागिरी, 12 जुलै, (हिं.स.) । भाट्ये (ता. रत्नागिरी) येथील समुद्रकिना-यावर बांधण्यात येणा-या बंधा-याला भाट्ये ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबत त्यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांना साकडे घातले आहे. वेळीच हे काम थांबवले नाही तर भविष्यात भाट्ये गावाचे नुकसान होईल, अशी भीती या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रत्नागिरीतील भाट्ये खाडी पूल जेथे संपतो त्या ठिकाणी या बंधार्याचे काम सुरू आहे. मुळात पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बंधाऱ्याचे काम सुरू आहे. भाट्ये ग्रामस्थांनी या बंधार्याची मागणीच केली नसताना बंधारा का बांधला जात आहे, असा प्रश्न ग्रामस्थ राकेश गजानन भाटकर यांनी पत्राद्वारे केला आहे. या बंधार्यामुळे गावातील किनार्याच्या दक्षिणेकडील भागात मोठी धूप होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित बंधार्याच्या बाजूला घरांच्या व जमिनीच्या जवळपास दोन प्रमुख जागा येतात. हा भाग नेहमी धोक्यात असतो. त्यामुळे पुलाचे बांधकाम त्रासदायक ठरणार आहे. भाट्ये ग्रामस्थांनी या संदर्भातील निवेदन मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री राणे यांना दिले; परंतु या मंत्रालयाने कोणतीच दखल घेतलेली नाही.

रत्नागिरीतील नर्मदा सिमेंट भगवती बंदर येथील आणि मिरकरवाडा येथील बंधा-यामुळे मिर्या गावाची जी अवस्था झाली आहे तशीच स्थिती भाट्येची होईल, असे ग्रामस्थांचे मत आहे. तसे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande