छ. संभाजीनगर : पिशोर येथे मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। पिशोर येथे मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा शिवसेना आमदार संजना जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)।

पिशोर येथे मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा शिवसेना आमदार संजना जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी, महिला बचतगट, छोटे उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ मिळून स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होईल, असा विश्वास आहे.

मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन! या संस्थेची वाटचाल यशस्वी होवो व ग्रामीण विकासात मोलाचे योगदान लाभो, हीच सदिच्छा.! आमदार जाधव यांनी व्यक्त केली

कन्नड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात संस्थेच्या माध्यमातून आणि विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande