कॅम्पस मुलाखतीमधून २९ विद्यार्थ्यांची निवड - प्रत्येकी चार लाखांचे वार्षिक पॅकेज
छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै (हिं.स.)। '' ृृडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २९ विद्यार्थ्यांची ''कॅम्पस प्लेसमेंट'' मधून औषधी क्षेत्रातील ’सिरम इन्स्टियूट’ या प्रख्यात कंपनीत निवड झली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार लाखांचे वार
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै (हिं.स.)।

' ृृडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २९ विद्यार्थ्यांची 'कॅम्पस प्लेसमेंट' मधून औषधी क्षेत्रातील ’सिरम इन्स्टियूट’ या प्रख्यात कंपनीत निवड झली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार लाखांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे, अशी माहिती प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीष काळे यांनी दिली.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ’ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल’चे काम सुरु आहे. प्लेसमेंट सेल तसेच सीआयआय मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीसाठी 'कॅम्पस इंटरव्ह्यू'चे आयोजन करण्यात आले. यासाठी बी. एस सी. , एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या सर्व विषयाचे मिळून ३६२ विदयार्थ्यांनी मुलाखत दिली. यावेळी प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे यांनी मार्गदर्शन केले. तर सिरम इन्स्टिट्यूटचे एच.आर प्रतिनिधी लक्ष्मीकांत खिस्ती यांनी निवड प्रक्रिया समजावून सांगितली. ३६२ पैकी २९ विद्यार्थ्यांची कंपनीत जाऊन अंतिम मुलाखत तसेच वैद्यकीय चाचणी नंतर अंतिम निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांची या विद्यार्थ्यांची पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये प्रोडक्शन विभागामध्ये ट्रेनी या पदावर नेमणूक केली जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नौकरीची संधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलबद्घ करून देण्यासाठी विद्यापीठातील प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीश काळे, शिल्पा जिरे, संदीप दाभाडे तसेच सीआयआय मॉडेल करिअर सेंटरचे शिवराज राजुरे, योगेश कोकणे, विशाल ढगे, अक्षय कोकणे यांनी परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande