माणगाव येथे गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
माणगाव, 13 जुलै (हिं.स.) : दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट, चिंचवळी–गोरेगाव आणि कुणबी समाज बत्तीशी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी, बारावी तसेच विविध परीक्षांमध्ये ६० टक्क्यांहून अधि
**हेडिंग :** **दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट व कुणबी समाज बत्तीशी विभागातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात**  **माणगाव :** दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट, चिंचवळी–गोरेगाव आणि कुणबी समाज बत्तीशी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी, बारावी तसेच इतर परीक्षांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुणबी समाजातील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.  नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या पंचायत समिती माणगावचे सभापती विलास शिंदे, उपसभापती मालोरे तसेच सदस्यांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी माजी सभापती संगीता भक्कम, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश टेंबे, अरुण चालके, महेंद्र तेटगुरे, पंढरी शेडगे, मधूकर नाडकर, ज्ञानेश्वर पदरत, स्वाती करकरे, रविंद्र टेंबे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, कुणबी एकता मंचाचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी **दहावी-बारावीनंतर पुढे काय?** या विषयावर विशेष करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. भात्रेत कोचिंग क्लासेसचे संतोष भात्रे आणि संजीवनी क्लासेसच्या संचालिका संजीवनी उभारे यांनी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी शेडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन वामन बैकर यांनी केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


माणगाव, 13 जुलै (हिं.स.) : दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट, चिंचवळी–गोरेगाव आणि कुणबी समाज बत्तीशी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी, बारावी तसेच विविध परीक्षांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुणबी समाजातील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले पंचायत समिती माणगावचे सभापती विलास शिंदे, उपसभापती मालोरे तसेच सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी सभापती संगीता भक्कम, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश टेंबे, अरुण चालके, महेंद्र तेटगुरे, पंढरी शेडगे, मधुकर नाडकर, ज्ञानेश्वर पदरत, स्वाती करकरे, रविंद्र टेंबे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, कुणबी एकता मंचाचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी कार्यक्रमात दहावी-बारावीनंतर पुढे काय? या विषयावर विशेष करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. भात्रे कोचिंग क्लासेसचे संतोष भात्रे आणि संजीवनी क्लासेसच्या संचालिका संजीवनी उभारे यांनी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि विविध करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी शेडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन वामन बैकर यांनी केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande