बीड : एटीएम रुमचा कोसळला स्लॅब, सुदैवाने जीवितहानी नाही
बीड, 13 जुलै (हिं.स.)। बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपाजवळील बावळे कॉम्प्लेक्समधील एसबीआय एटीएमचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने घटनेच्या वेळी एटीएममध्ये कोणताही ग्राहक नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने शहरा
एटीएम


बीड, 13 जुलै (हिं.स.)। बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपाजवळील बावळे कॉम्प्लेक्समधील एसबीआय एटीएमचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने घटनेच्या वेळी एटीएममध्ये कोणताही ग्राहक नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याची दखल घेऊन नगरपालिका काही क्शन घेणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वाढती लोकसंख्या आणि ग्राहकांच्या सोयीसाठी राष्ट्रीयकृत बँकासह विविध बँकांनी जागोजागी एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करून

दिलेली आहे. हे एटीएम अनेक वर्षांपासून एकाच इमारतीमध्ये आहे. बावळे कॉम्प्लेक्स मधील या घटनेनंतर एटीएमच्या छताचा मोठा भाग कोसळून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या. काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या घटनेनंतर बीड शहरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नियमितपणे होते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपरिषदेने धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर पावसाने दमदार हजेरी लावली तर अशा जुन्या इमारती मोठ्या प्रमाणात दुर्घटनाग्रस्त होतील. जर यामध्ये जीवित आणि वित्त हानी झाली तर त्याला जबाबदार कोण ? दुसरीकडे, एसबीआय प्रशासनाने संबंधित एटीएम तात्काळ बंद करून तांत्रिक तपासणी करावी आणि ग्राहकांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande