लातूरमध्ये 161 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
लातूर, 13 जुलै (हिं.स.) :लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अपघातांच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसा
पोलीस कारवाई


लातूर, 13 जुलै (हिं.स.) :लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अपघातांच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची ब्रेथ अनालायझरच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली.या कारवाईत विविध कालावधीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दि. ८ मे २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत ६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

दि. ७ जून २०२६ ते १३ जून २०२६ या कालावधीत ७२ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दि. ७ जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत २७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेद्वारे एकूण १६१ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल

लातूर पोलीस दलाकडून रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना आवाहन

लातूर पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. स्वतःचा तसेच इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण निर्माण करावे.रस्ते सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande