
अमरावती, 13 जुलै (हिं.स.)आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आधुनिक ज्ञानाची गरज लक्षात घेता, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिंदी विभागाद्वारे 'एम.ए. (अनुवाद हिंदी)' हा विशेष व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्याथ्र्यांचा बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगाराच्यादृष्टीने अत्यंत प्रभावी ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त अमरावती विद्यापीठातच हा विशेष अभ्यासक्रम उपलब्ध असून यामध्ये एकूण 30 जागा आहेत.
अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट : केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये 'राजभाषा अधिकारी' आणि 'अनुवादक' यांसारख्या प्रतिष्ठापूर्ण पदांवर नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी. विविध क्षेत्रांत वाव : पत्रकारिता, रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, टेलिकॉम, बँकिंग, विमा कंपन्या आणि परदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रमात यूजीसी च्या निर्देशानुसार सेट/नेट परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा समावेश केल्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक पदासाठी पात्र होऊ शकतात. द्विभाषिक प्रशिक्षण : या अभ्यासक्रमात इंग्रजी आणि मराठी भाषेतून हिंदी भाषांतराचे विशेष प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून मराठी भाषिक विद्यार्थीही यात उत्तम करिअर करू शकतात. नोकरीसोबतच स्वतंत्रपणे अनुवादक म्हणून काम करण्याची आणि स्वावलंबी बनण्याची उत्तम संधी. विभागाचा माजी विद्यार्थी अनिकेत बोरकर 'हिंदुस्तान एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग विभाग, नाशिक' येथे राजभाषा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मराठी भाषिक असूनही माजी विद्यार्थिनी कु. सरिता नंदेश्वर ही 'भारतीय संसद, लोकसभा, नवी दिल्ली' येथे कार्यरत आहे. माजी विद्यार्थी डॉ. श्यामप्रकाश पांडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत. विभागातून जवळपास 30 विद्याथ्र्यांनी आचार्य (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली असून, 70 हून अधिक विद्याथ्र्यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत नोक-या मिळवल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, एन.टी. शिष्यवृत्तीव्यतिरिक्त, केंद्र सरकारची 'हिंदीतर भाषिक शिष्यवृत्ती' देखील विद्याथ्र्यांना दिली जाते. तसेच विभागातर्फे विद्याथ्र्यांना रेमिडियल वर्ग, सेट/नेट परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी निःशुल्क मार्गदर्शन दिले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी