सोनपेठ : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
परभणी, 13 जुलै (हिं.स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ तालुक्यात पक्षाच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आमद
सोनपेठ तालुक्यात शिवसेनेच्या विविध पदांवर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण


परभणी, 13 जुलै (हिं.स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ तालुक्यात पक्षाच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी आमदार संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे आणि तालुकाप्रमुख संतोष गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रामेश्वर पोते यांची तालुका संघटक, श्रीकृष्ण साठे यांची तालुका समन्वयक, तर दत्तात्रय सपाटे यांची उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी प्रल्हाद काळे (उखळी), केशव राठोड (नरवाडी) आणि नवनाथ क्षीरसागर (शेळगाव) यांची निवड करण्यात आली.

तसेच पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी कारभारी इंगळे (डिघोळ), गोविंद सावंत (उखळी), पांडुरंग कदम (नरवाडी), मुंजाभाऊ तेलभरे (शिर्शी), कृष्णा कलींदर (वडगाव) आणि मुंजा भांडवले (शेळगाव) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा आमदार डॉ. राहुल पाटील, मीराताई रेंगे, रविंद्र धर्मे आणि कल्याणराव रेंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हा विचार पुढे नेत पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सोनपेठ तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवून संपूर्ण तालुका पुन्हा भगवामय करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande